सर्वांगीण विकास हे कलादालनचे सूत्र आहे. संगीत कला ही सर्वांगीण विकासाचाच एक भाग : .आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे
कोरेगाव पुढारी वृत्त सेवा
सर्वांगीण विकास हे कै माधवराव शेंडे स्मृती ट्रस्ट कलादालनचे सूत्र आहे. संगीत कला ही सर्वांगीण विकासाचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन .आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी केले.
ते कै. माधवराव शेंडे स्मृती ट्रस्ट कलादालन रहिमपूर यांचा देव दिवाळी संध्या हा अनोख्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जागतिक कीर्तीच्या युवा गायिका शास्त्रीय संगीताच्या गाड्या अभ्यासक सावनी शेंडे, माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, चौडेश्वरी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन अरुण माने, कलादालनच्या व्यवस्थापीका सौ मधुमती माने एम. डी. माने, एन. ए. माळवदे एस. ए.जावळे उपस्थित होते.
रहिमतपूर येथील वीरशैव तराळे समाज जंगम मठ येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे यांच्या संकल्पनेतून देव दिवाळीची संगीतमय संध्या रहिमतपूर व पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांना अनुभवता आली.
जागतिक कीर्तीच्या युवा गायिका शास्त्रीय संगीताच्या गाड्या अभ्यासक सावनी शेंडे यांनी आपल्या संगीतमय मुलाखतीतून रक्षित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रहिमतपूर कलादालनच्या व्यवस्थापीका सौ मधुमती माने यांनी मनमंद मुराद गप्पातून सावनी शेंडे यांच्या बालपणा पासूनच्या संगीतमय प्रवासाला बोलके केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना सावनी शेंडे यांनी कलेची साधना कशी करावी, शिक्षण आणि कला यांची योग्य सांगड कशी घालावी याचे बहुमोल मार्गदर्शन केले.
कलादालनातील विद्यार्थ्यांनी नृत्य, वादन आणि गायन या विविध अविष्कारातून आपल्या कलेचे उत्तम सादरीकरण केले. यावेळी आली माझ्या घरी ही दिवाळी या गीतापासून ते मनाच्या धुंदीत लहरीत ये ना ” अश्या असंख्य गीता पर्यंत प्रेक्षकांना खेळवून ठेवले.या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला
कै माधवराव शेंडे स्मृती ट्रस्ट कलादालनातं संपन्न झालेल्या कार्यक्रमाद्वारे जागतिक कीर्तीच्या गायिकेशी रहिमतपूर सारख्या निमशहरी भागातील विद्यार्थ्यांचा संवाद साधता आला याचे सार्थक झाले असे प्रतिपादन व्यवस्थापीका सौ मधुमती माने यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रहिमतपूर नगरीचे नगराध्यक्ष आनंद कोरे यांच्या हस्ते सावली शेंडे यांचे स्वागत करण्यात आले. डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी कला दालनातील शिक्षक एन. ए. माळवदे एस. ए.जावळे व कुमारी आरती जमादार यांचे स्वागत केले.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र शेंडे यांनी स्वतः करून कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप दिले.त्यांचे चौंडेश्वरी एज्युकेशन संस्था सोसायटी संस्थापक विशेष सहकारी भरत माने यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मधुमती माने यांनी केले.
Leave a Reply