१२ मार्च हा दिवस मला दर वर्षी एका आठवणींच्या (विरह) गुहेत घेऊन जातो. आनंदात जगण्यासाठी काय विचारधारणा लागते याच्या शोधात मी त्या गुहेत शिरतो.
कै. माधवराव गंगाधर शेंडे (१९१८-२००५) हे माझे पिता. १२ मार्च रोजीच ते इहलोकीचे संगीत सोडून यमन रागाच्या आरोहात विलीन झाले. हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी त्यांनी स्वतःचे जीवन वाहून घेतले. गावातील अनेक तरुणांना त्यांनी संगीताच्या प्रवाहात आणले. शहरात संगीताचे सूर नेहमी गाजतात. पण, त्यांनी जाणीवपूर्वक ग्रामीण भागात संगीताचा प्रचार-प्रसार केला. तोच त्यांचा आनंद होता. त्यांच्या अनेक आठवणींनी आज सूर व ताल धरला जातो.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
—
डॉ. राजेंद्र शेंडे
Leave a Reply