शनिवार दिनांक ०६/०८/२२ रोजी सकाळी रहिमतपूर कलादालनाची पालकसभा शिक्षक,पालक आणि माधवराव शेंडे ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या अध्यक्षते खाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेदरम्यान खालील विषयाची चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे पालकांनी विविध सूचना केल्या त्या स्वागतार्य होत्या. सभेदरम्यान खालील आढावा घेण्यात आला.
१) कलादांना तील विद्यार्थ्यांची कलाक्षेत्रातील वाटचाल.
२)कलादांनाच हेतू व कार्य.
३) कलादालनातील विविध समस्यावर चर्चा.
४)कलादालनाचा प्रचार प्रसार आणि जाहिरात
५) कलादालनातील विद्यार्थ्यांची भविष्यातील वाटचाल
६) विद्यार्थ्यांची फी मधील दिरंगाई. या विविध विषयावरती चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान पालकांनी काही सूचना केल्या आहेत. त्यावर हे कलादालन नक्कीच कार्य करेल अशी ग्वाही श्री राजेंद्र शेंडे यांच्याकडून देण्यात आली सूचना खालील प्रमाणे.
१) अभ्यासक्रमाचे छोटेसे व्हिडिओ तयार करणे व कलादालनाच्या ग्रुप वरती पाठवणे.
२)विद्यार्थ्यांच्या प्रगती चा अहवाल तयार करणे
३)विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
Leave a Reply