स्वरराज छोटा गंधर्व २६व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शालेय गायन स्पर्धेत, स्व माधवराव शेंडे स्मृती ट्रस्ट अंतर्गत संचालित कलादालनाच्या विद्यार्थिनींनी भव्य यश संपादन केले आहे.
कुं स्वराली कुलकर्णी हिला ज्येष्ठ गटात प्रथम क्रमांक तर गार्गी कांबळे हिला कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
स्व माधवराव शेंडे यांनी ग्रामीण भागात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा वारसा पुढे चालवत कलादालन ची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू आणि शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास उत्सुक मुला – मुलींना संगीताचे शिक्षण दिले जाते.
ग्रामीण भागात शास्त्रीय शिक्षणाचा प्रसार हेच आमचे ध्येय.
Leave a Reply